MP Anil Bonde |  अनिल बोंडे भाजपात येण्यापूर्वी रात्री घेत होते, आता ते दिवसाही ढोसतात, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांचे बोंडेंना प्रत्युत्तर

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल गांधी (Rahul  Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर (Congress’ ‘Bharat Jodo’ Yatra)  भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी टीका करत, राहुल गांधी यांची तुलना रावणासोबत केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर (Dilip Yedatkar) यांनी अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

डॉ. अनिल बोंडे (MP Anil Bonde) भाजपमध्ये येण्यापूर्वी रात्री दारु पीत होते. पण आता भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी दिवसा देखील ढोसायला सुरुवात केली आहे. याचेच हे निदर्शन आहे. कशाची तुलना कुणाशी करायची, कुठे करायची, काय करायची, याचे त्यांना भान राहिले नाही. भाजपमध्ये जे वकूब नसलेले बेवकूब लोक आहेत. त्यांच्यात डॉक्टर आघाडीवर आहेत. त्यांच्या बेवकूफीची बक्षिशी त्यांना राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवून देण्यात आली.

त्यामुळे ‘रा’ पासून जर का राहुल आणि रावण होत असेल, तर ‘न’ पासून नरेंद्र आणि नराधम देखील होतो. ‘अ’ पासून अमित होतो आणि अमानुष देखील होतो. त्यामुळे अनिल बोंडेंनी याला देखील मान्यता दिली पाहिजे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपची प्रचंड तंतरलेली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपचा पूर्ण सुपडा साफ होणार असल्याने त्यांची ही बेताल वक्तव्ये आहेत, असे दिलीप एडतकर म्हणाले.

भाजपचे राज्यसभा खासदार यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट रावणासोबत केली होती.
रामाने उत्तरेपासून दक्षिणेकडे कूच केली होती. राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तरेकडे चालले आहेत.
त्यामुळे त्यांचा आणि रामाचा काही संबंध नाही. त्यांच्यात आणि रावणात जास्त साम्य आहे, असे भोंडे म्हणाले होते.
त्यावर काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title :- MP Anil Bonde | Before joining BJP, Anil Bonde used to sleep at night, now he sleeps during the day too, Congress spokesperson Dilip Edtkar’s reply to Bonde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा