MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra Politics) सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच सदस्यीय घटनापीठापुढे होणार आहे. हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी शिंदे गट आणि केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Government) टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे गटाच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.
हे राज्यपालांना कोणी सांगितलं?
अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले, उद्याची सुनावणी हा शिवसेना (Shivsena) किंवा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष केवळ एवढ्यापूरता मर्यादीत विषय नाही. ज्यावेळी सभागृहामध्ये कोणाचेही बहुमत नसते, त्यावेळी ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. परंतु तसे घडलेले नाही. त्यानंतर सभागृह नेता सुद्धा निवडला गेला. नाही मग राज्यपालांनी (Governor) कशावरुन मुख्यमंत्र्यांना शपथ दिली? हे राज्यपालांना कोणी सांगितले? इथूनच घटनेचा अवमान करण्याचे काम सुरु झाले आणि ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यामुळे राज्यातील हे सरकार घटनाबाह्य असल्याचे सावंत म्हणाले.
आयोगाने कोणाच्या इशाऱ्यावर निर्णय घेतला?
पक्षाच्या चिन्हाबाबतचा (Party Symbol) निर्णय निवडणूक आयोग (Election Commission) घेणार आहे. त्यांच्याकडे आम्ही पुरावे दिले आहेत. हे पुरावे सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबर तारीख देण्यात आली होती. त्यानंतर एक दिवसही वाढवून दिला जाणार नसल्याचे आयोगाने सांगितले होते. मात्र, त्यानंतर आयोगाने स्वत: तारीख वाढवून दिली. हा निर्णय कोणाच्या इशाऱ्यावर घेतला? असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र
लोकशाहीच्या मुळावर हल्ला करण्याचे काम केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार करत आहे. तसेच सध्या देशात न्याय मिळवण्याचे एकमेव ठिकाण हे सर्वोच्च न्यायालय असून या सुनवाणीला जेवढा उशीर होईल तेवढा न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होईल, असेही अरविंद सावंत म्हणाले.
Web Title :- MP Arvind Sawant | arvind sawant criticized bjp and eknath shinde group before hearing in supreme court
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी