MP Arvind Sawant | ‘सध्या केंद्र सरकार महाष्ट्राची शोभा करतंय, त्यामुळे…’, अरविंद सावंत यांचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज गुढीपाडव्याचा सण (Gudipadva Festival) उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढल्या जात आहेत. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शोभा यात्रा (Shobha Yatra) काढल्या जात आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गिरगावमध्ये संविधानाची (Constitution) प्रतिकृतीसह शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) हे सहभागी झाले होते. या शोभा यात्रेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अरविद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केंद्र सरकार (Central Government) आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला.

भारताचे संविधान आमचा स्वाभिमान

यावेळी बोलताना अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले, आमचा एक शाखा प्रमुखांनी संविधानाच्या प्रतिकृसह शोभा यात्रेचे आयोजन केलं आहे. भारताचे संविधान आमचा स्वाभिमान आहे. परंतु याच संविधानवर आज हल्ला होत आहे. विशेषत: महाराष्ट्र धर्मावर, मराठी संस्कृतीवर (Marathi Culture) हल्ला केला जात आहे. मराठी भाषेला अद्याप अभिजात दर्जा प्राप्त झालेला नाही. राज्यात येणारे उद्योग बाहेर जात आहेत. वस्त्र उद्योगाचे कार्यालय (Textile Industry Office) देखील महाराष्ट्रातून हलवले जात आहे. आज देशात महागाई, महिला अत्याचार यामध्ये वाढ झाली आहे. शेतकरी, बेरोजगारांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा प्रश्नांवर अधारीत ही शोभा यात्रा काढली असल्याचे सावंत यांनी सांगितले.

केंद्र सरकार महाराष्ट्राची शोभा करतंय

गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवरील प्रश्न मांडण्यात आले आहेत. ही शोभा यात्रा बघून आमचा उर भरुन येतो. केंद्र सरकार सध्या महाराष्ट्राची शोभा करत आहे. त्यामुळे मराठी माणसाला अंतर्मुख करणारी ही शोभा यात्रा असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.

Web Title : MP Arvind Sawant | arvind sawant criticized modi government in gudipadwa melava in girgaon mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Premier Handball League (PHL) | प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये आता महाराष्ट्र आयर्नमेन संघाची एन्ट्री; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे संघाची मालकी

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरी धमकी प्रकरणात तरुणी ताब्यात, नागपूर पोलीस कर्नाटकला रवाना

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Sangli ACB Trap | 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात