MP Arvind Sawant । शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले – ‘बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरावरून वातावरण चांगलंच तापलं असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज यांच्या भूमिकेवरून आता शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी आपलं मत मांडलं आहे.

MP Arvind Sawant criticizes raj thackerays stance on renaming navi mumbai international

काय म्हणाले सावंत?

नवी मुंबईचे विमानतळ हे मुंबईतील विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा राज ठाकरे यांचा फक्त तर्क आहे. हे विमानतळ खरं तर नवीन असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच, मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा मतितार्थ त्यांनी काढला असल्याही म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांना किती आदर आहे हे समोर आलं. हे खेदजनक असून, वाईट वाटत असल्याचं खा. अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अरविंद सावंत म्हणाले, बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करु नये. असं म्हणत, बाळासाहेबांच्या नावे स्मारक उभं राहत आहे, त्याचा अभिमान बाळगा, असं आवाहन देखील त्यांनी केलंय. दि. बा. पाटील यांनी चांगलं काम केलं यात वादच नाही. जातीचं आणि समाजाचं राजकारण काही लोक करत आहेत. दि. बा. पाटील यांचं नाव वेगळ्या प्रकल्पासाठी देऊ. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण बाजूला ठेऊन सगळ्या पक्षांना आवाहन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत म्हणूनच नाव देत आहोत. ते जर आज असते तर प्रश्नच नसता, असे देखील अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. परंतु, नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोड देखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

MP Arvind Sawant criticizes raj thackerays stance on renaming navi mumbai international

आमदार प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले.
नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे.
सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची.. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे.
मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली.
कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं.
तेव्हाची मुंबई पकडली, ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती.
मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं.” असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

 

Imran Khan । इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार’

MP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले – ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते’

कामगारांना मोठा दिलासा मिळणार ! 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल भरपाई; एक दिवस उशीर झाला तरी द्यावं लागणार 12 % व्याज


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MP Arvind Sawant | criticizes raj thackerays stance on renaming navi mumbai international

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update