MP Arvind Sawant | ‘किरीट सोमय्या नालायक, लायकी नसलेला माणूस, त्याला तुम्ही’…; खा. अरविंद सावंत माध्यमांवर भडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी जोरादर टीकास्त्र सोडले आहे. किरीट सोमय्या हा लायकी नसलेला माणूस असल्याची घणाघाती टीका अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केली आहे.

 

अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले, किरीट सोमय्या हा काही महात्मा नाही. यापूर्वी त्यांनी केलेल्या आरोपांचे काय झाले? किरीट सोमय्या हा लायकी नसलेला माणूस आहे. त्यांनी आधी केलेले आरोप सिद्ध करायला लावा अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली.

 

यावेळी सावंत हे प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले, तुम्ही हा धंदा आधी बंद करा. किरीट सोमय्या हा काही महात्मा नाही. त्याला आधी प्रश्न विचारा की, त्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आणि जे त्यांच्या पक्षात गेले, त्याचं काय झालं? हे तो सांगत नाही. तोपर्यंत सोमय्याच्या कोणत्याही वक्तव्याची दखल मी नव्हे तर कुणीच घेऊ नये, असं मला वाटतं.

ज्यांना आपण नालायक म्हणतो अशी ही लायकी नसलेली माणसं आहेत.
त्याला तुम्ही दत्तक का घेतलंय हेच मला कळत नाही.
तुम्ही दत्तक घेणं बंद करा. सोमय्यांनी यापूर्वी जे आरोप केले होते,
ते सिद्ध करायला लावा, ते तुमच्या लाँड्रीत कसे स्वच्छ झाले? ते आधी सांगा,
मग दुसऱ्यांवर आरोप करा, असा घणाघात अरविंद सावंत यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

Web Title :- MP Arvind Sawant | MP aravind sawant on kirit somaiyya allegations on rashmi thackeray 19 bunglow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा