MP Arvind Sawant | ‘रिक्षावाला’ शब्दावरुन अरविंद सावंत यांचा यु-टर्न, म्हणाले – ‘तो शब्द शरद पवारांचा नाही, तो शब्द…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाबाबत गौप्यस्फोट केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), अशोक चव्हाण (Ashok Chavan), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), जयंत पाटील (Jayant Patil), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारल्याचे अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनीच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray गळ घातल्याचे म्हटले होते.

काल छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा झाली. याच सभेत बोलताना अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, यानंतर अरविंद सावंत यांनी यु-टर्न घेतला आहे. ‘रिक्षावाला’ शब्द शरद पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे. एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) हाताखाली काम करणार का? असं पवार म्हणाले होते, अशी सारवासारव सावंत यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

काय म्हणाले अरविंद सावंत?

एका वृत्तवाहिनीने अरविंद सांवंत यांना ‘रिक्षावाला’ असा उल्लेख शरद पवारांनी केला होता की,
बोलण्याच्या ओघात तुम्ही बोललात असे विचारले. यावर बोलताना त्यांनी यु-टर्न घेतला.
ते म्हणाले, शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना आग्रह केला की, तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं.
कारण तुमच्याशिवाय हे शिवधनुष्य कोण पेलणार? कारण ही सर्व दिग्गज मंडळी आहेत.
तुम्ही जे नाव सुचवताय त्यांच्यासोबत एकत्र काम करणं शक्य नाही. ही वस्तुस्थिती आहे.
शिंदे रिक्षावालेच होते. त्यामुळे आम्ही तो शब्द वापरतो. सावंत पुढे म्हणाले, रिक्षावाला असा उल्लेख मी केलेला आहे.
तो पवारांनी नाही, हे मी जाहीरपणे सांगतो. शरद पवारांची ती भाषा नाही,
ही शिवसैनिकांची भाषा असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.

Advt.

Web Title :- MP Arvind Sawant | mp arvind sawant maharashtra politics sharad pawar sattement-on cm eknath shinde at uddhav thackrey maha vikas aghadi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

Pune Lok Sabha Bypoll Election | गिरीश बापटांचा वारसदार कोण? BJP कडून 5 नावं चर्चेत तर काँग्रेसचे ‘हे’ 2 नेते इच्छुक

Maharashtra Politics News | ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना काका आणि आकांना विचारलं का?’, भाजपचा अजित पवारांना सवाल