MP Arvind Sawant | मनसे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देणार का? खासदार अरविंद सावंतांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना पाठिंबा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ही पहिली भूमिका मांडली त्याला थोडा उशीर झाला. असे असले तरी ही भूमिका स्वागतार्ह आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांनी या संस्कृतीची भाजपाला (BJP) आठवण करून दिली हेही खूप झाले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी दिली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपाला पत्र देऊन अंधेरीची निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. याबाबत अरविंद सावंत (MP Arvind Sawant) बोलत होते.

 

अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले, उशीर झाला असे मी म्हटलो कारण उमेदवारी अर्ज भरेपर्यंत बराच वेळ गेला. मधल्या काळात तमाशा करण्यात आला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे विधानसभेची निवडणूक लागली आहे असे सांगत शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि पक्षचिन्ह गोठवायला लावले. ते उभे राहिले का?

 

भाजपावर आरोप करताना सावंत म्हणाले, हा प्लॅन कोणाचा? हे षडयंत्र भाजपचेच होते. शिंदे गट त्यांच्या हातातील बाहुले आहे. त्यांचा वापर करून शिवसेनेचे खच्चीकरण सुरू आहे. हे एकच भाजपाचे उद्दिष्ट आहे.

अरविंद सावंत म्हणाले, भाजपाने एकदाही म्हटले नाही की आम्ही निवडणूक लढणार आहोत की नाही. तेव्हा शिंदे गटाला झुंजवत ठेवले. त्यांचा हेतू शिवसेना संपवायची हाच होता. त्यासाठी त्यांनी शस्र म्हणून एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) वापर केला.

 

राज ठाकरेंनी पत्र लिहून एक पाऊल टाकले, आता शिवसेना एक पाऊल टाकणार का? असा प्रश्न विचारला असता सावंत म्हणाले, हा विषय पुढे नेऊ नका.
त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे वक्तव्य केले आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो.
भाजपा उमेदवारी अर्ज मागे घेईल असे मला वाटत नाही.

 

Web Title :- MP Arvind Sawant | Will MNS support Shiv Sena in Andheri by-election? MP Arvind Sawant gave ‘this’ answer