‘या’ काॅंग्रेस उमेदवाराची भरसभेत झाली ‘पंचाईत’ ; मतदानाची तारीखच आठवेना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. विविध पक्षांचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते मतदानाची तारीख सांगून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काँग्रेसचे खासदार व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चक्क दुसऱ्याच तारखेला मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण यांचेही भाषण झाले. या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले, विरोधकांवर टीका-टिपण्णी केली. मात्र भाषणाच्या शेवटी ते मतदानाची तारीखच विसरले आणि त्यांनी भलत्याच दिवशी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी येत्या १९ तारखेला पंजा या निशाणीवर मतदान करावे, असे आवाहन केले. त्यांनी मतदानाची तारीख चुकीची सांगितल्याने सर्वच जण आवाक झाले. यावेळी राहुल गांधी, सुभाष वानखेडे, मच्छिंद्र कामंत, मुकुल वासनिक, मधुसुदन मिस्त्री, संपत कुमार, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र दर्डा, कमलकिशोर कदम आदी उपस्थित होते.

Loading...
You might also like