बॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला वडिलांचा ‘खून’, मृतदेह कुजल्यानंतर टाकलं ते सुगंधी द्रव्य

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील बैतूल येथून एक खळबळजनक घटना समोर येत आहे, जेथे एका दत्तक मुलीने तिचा प्रियकर आणि मित्रांसह मिळून वडिलांची हत्या केली. ते ही यामुळे की तिच्या वडिलांनी तिला तिच्या प्रियकरांशी मोबाईलवर बोलण्यास नकार दिला. तसेच, तिला त्याच्याबरोबर फिरायला जाण्यास परवानगी देत नव्हते. वडिलांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून घराच्या मागील झोपडीत लपविला.

हे खळबळजनक प्रकरण बैतूलच्या सारणी भागातील आहे. जिथे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शनिवारी सारणी पोलिसांनी या हत्येचा खुलासा करत असे म्हटले आहे की या हत्येतील मृत व्यक्तीच्या दत्तक मुलीने आपल्या मित्रांसह ही घटना घडवून आणली. मुलीने हत्या केल्यानंतर मृतदेह दोन दिवस घरात ब्लँकेटमध्ये लपवून ठेवला होता.

पोलिसांनी सांगितले की 14 जानेवारी रोजी बबलू नागले यांनी पोलिसांना कळवले की त्याचे मेहुणे श्रीराम हुरमाडे आणि त्यांची दत्तक घेतलेली अल्पवयीन मुलगी सुभाष नगरमध्ये राहतात. ते श्रीरामशी फोनवर बोलत असत, परंतु 12 जानेवारी रोजी त्यांच्याशी बोलणे झाले नाही. 14 जानेवारीला परिसरातील लोकांना समजले की श्रीराम हुरमाडे यांच्या घरामागील कुंपणात बनविलेल्या झोपडीतून दुर्गंध येत आहे. पण त्यांची मुलगी तिथे बघायला जाऊ देत नव्हती. त्यानंतर बबलूने श्रीरामच्या घरी जाऊन दरवाजा उघडला तर त्यांना झोपडीत श्रीराम यांचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला आढळला, मृतदेहाच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि गळा कापलेला होता.

यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्टेशन प्रभारी महेंद्र सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली गेली आणि प्रकरणाची काटेकोरपणे चौकशी करण्यात आली तेव्हा समजले की मृतक आपल्या मुलीला प्रियकर आणि मित्रांसह हिंडण्या-फिरण्यासाठी आणि मोबाईलवर बोलण्यास नकार देत होते. यामुळे अल्पवयीन मुलीने अस्वस्थ होऊन आपल्या प्रियकर आणि मित्रांसह योजना आखली आणि तिच्या वडिलांची हत्या केली.

पोलीस स्टेशन प्रभारी महेंद्र सिंह चौहान यांनी पुढे सांगितले की, मृतदेह घराच्या मागील बाजूस बांधलेल्या झोपडीत लपवलेला होता आणि वास येऊ नये म्हणून परफ्यूम मारण्यात आला होता. दत्तक मुलगी हत्येच्या या प्रकरणात मास्टरमाइंड निघाली. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलगी, 21 वर्षीय अन्वर खान, 18 वर्षीय शिखर आणि 20 वर्षीय अनिल सोनारिया यांना अटक केली आहे.