खा. डॉ. भारती पवार यांनी घेतला दिंडोरी तहसील कार्यालयात तालुक्यातील कामांचा आढावा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दिंडोरी तहसील कार्यालयात सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांची विविध कामांच्या संदर्भात खा.डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने दिंडोरी शहराच्या वाहतूक संदर्भात भेडसावत असलेल्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर दिंडोरी, पालखेड चौफुलीवर सिग्नल बसवावा, शहरात पार्कींग झोन ठरवून द्यावा, नो पार्किंग बोर्ड लावावे, जिथे कायम वाहतूक कोंडी होते तेथे कायमस्वरूपी ट्राफिक पोलीस उपलब्ध करून द्यावेत. ह्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून सदर प्रकरणी उचित कार्यवाही करण्याच्या सूचना खा.डॉ.भारती पवार यांनी केल्या.

दिंडोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील समस्या जाणून घेत त्यात ओझरखेड ते शंखेश्वर मंदिर या रस्त्याच्या वाढीसाठी लवकरात लवकर चर्चा करून तो मार्गी लावावा, तसेच रस्त्यांचे काम सुरू असताना धूळ उडून पिकांचे अतोनात नुकसान होते त्यामुळे काम करत असतांना त्यावर पाणी मारून काम करावे, ढकामबे ते रामशेज रस्त्याचा कामासंदर्भांत तसेच सध्या परीक्षेचा काळ असल्याने भारनियमन करू नये अश्या सूचना उपस्थित अधिकारी वर्गाला खा.डॉ.भारती पवार यांनी दिल्या.

सदर आढावा बैठकी प्रसंगी तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव, चंद्रकांत राजे,मंदाताई पारख, मंगला शिंदे, सविता सोमवंशी शाम मुरकुटे, तुषार वाघमारे, फारूक बाबा, विलास नाना देशमुख, कैलास केदार, लक्ष्मण गायकवाड, प्रमोद देशमुख, योगेश बर्डे, महेंद्र पारख, प्रकाश ठाकरे, प्रमोद भांबीरे सर, बाळासाहेब देशमुख काका वडजे, कुंदन जावरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.