MP Bhavana Gawali | अकोल्यातील गोंधळावर खासदार भावना गवळींनी केली तक्रार दाखल; खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांनी चिथावल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MP Bhavana Gawali | शिवसेनेची दोन गटात विभागणी झाल्यानंतर या दोन्ही गटातील वाद अनेकदा हिंसक वळण घेतात. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण आणि नेत्यांमध्ये शाब्दिक हल्ले महाराष्ट्रासाठी नवी गोष्ट नाही. या यादीमध्ये अजून एका घटनेची नोंद झाली आहे. अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या अंगावर आले, असा आरोप शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी तिथे उपस्थित खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना चिथावले असाही आरोप खासदार गवळी यांनी केला आहे. खासदार भावना गवळी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार केली आहे. (MP Bhavana Gawali)

 

आपला विदर्भ दौरा आटपून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत मंगळवारी अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी सुद्धा त्याच विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला निघाल्या होत्या. त्यावेळी आमदार नितीन देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते राऊतांना निरोप देण्यासाठी अकोला स्थानकावर त्यांच्या सोबत आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींना पाहताच त्यांच्यासमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदार भावना गवळी ट्रेनच्या डब्याबाहेर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. (MP Bhavana Gawali)

तत्सम, ‘आम्ही बाळासाहेबांचे नाव घेऊन लोकसभेत गेलो, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही आमचे विचार विकले नाहीत. असे वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांना आपले घर सांभाळता आले नाही, महाराष्ट्र सांभाळता आला नाही मग दुसरीकडे जाऊन काय होणार, असा सवालही त्यांनी केला. आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर आहेत. तिथे ते नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना भेटले. भावना गवळी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

 

Web Title :- MP Bhavana Gawali | cm eknath shinde group bhavana gawali filled complaint against shivsena vinayak raut akola news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…