MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसापूर्वी माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं की, संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, पण ऑन पेपर ते भाजपाचे खासदार आहेत. असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आता खा. छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पलटवार केला आहे. ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो, त्यांनी स्वतःहून मला हे पद सन्मानाने दिले आहे, अशा शब्दात खा. संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रत्युत्तर दिल आहे. त्यावेळी संभाजीराजें हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. (MP Sambhaji Raje’s reply to Chandrakant Patil)

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज (16 जून) मराठा संघटनेच्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरून संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) काल मंगळवारी आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांना खासदारकीच्या मुद्द्यावरून उत्तर दिल आहे. संभाजीराजे म्हणाले, “कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू द्या. मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे, मात्र, खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी मला आदरपूर्वक हे पद दिले. त्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांचे कौतुकच करतो, असं मोदी आणि फडणवीस यांची प्रशंसा करत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) प्रत्युत्तर दिल आहे.

पुढे संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) बोलताना म्हणाले की, ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. खासदारकी पद मला सन्मानपूर्वक दिल आहे. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) या सगळ्याशी माझं चांगलं जमतं. राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुद्धा मला जवळचे आहेत. आता तर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे देखील जवळचे झाले आहेत. म्हणून सगळ्यात पक्षात आपलं चागलं संबंध आहे, असं देखील संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे. तसेच, मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेला लढा हा फक्त मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मी भाजपा खासदार नाही.
परंतु, ऑन पेपर ते भाजपाचेच खासदार आहेत, असं त्यांनी म्हटलं.
तसेच, मला त्या वादात पडायचं नाही.
मराठा आंदोलनात कुणी चालढकल करत असेल, तर ते मान्य होणार नाही.
ते लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात.
परंतु, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

Wab Title :- MP Chhatrapati Sambhaji Raje on chandrakant patil maharashtra bjp devendra fadnavis

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप