कौन है वो ! असा उमेदवार ज्याची संपत्ती ६६० कोटी रुपये ; आणि एकही वाहन नाही

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाने काँग्रेस पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी छिंदवाडा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कमलनाथ यांचे सुपुत्र नकुलनाथ यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला त्याच्या संपत्ती विषयी माहिती द्यावी लागते. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. यात तब्बल ६६० कोटी रुपये संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एवढे असताना त्यांच्याकडे एकही वाहन नाही हि बाब विशेष आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या तुलनेत नकुलनाथ यांच्याकडे पाच पटीने अधिक संपत्ती आहे. नकुलनाथ यांच्याकडे ६१५.९ कोटींची जंगम मालमत्ता आहे, तर ४१.७७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी प्रिया यांच्याकडे २.३० कोटींहून अधिक जंगम संपत्ती आहे. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर संपत्ती नाही.

नकुलनाथ यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभा निवडणुकीत १२४.६७ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.