‘माझ्यासाठी ज्यांनी काम केले मी त्यांच्यासाठीच काम करणार’ ; खा. चिखलीकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – बड्या नेत्याचा पराभव करताच चिखलीकर यांची जीभ घसरत आहे का? चिखलीकर यांच्या त्या वक्तव्याने जिल्ह्यात चिखलीकर यांच्या बाजूने उभा न राहिलेल्या मतदारांना चक्क भाषणातून तंबी देत आहेत का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

देगलूर येथे नुकत्याच झालेल्या सत्कार सोहळ्यात चिखलीकर यांनी ‘माझ्यासाठी ज्यांनी काम केले त्यांच्यासाठीच काम करणार’ असे स्पष्ट केले. त्यामुळे खा. चिखलीकरांचा रोष नेमका कोणाविरुद्ध याचीच चर्चा सध्या सुरू आहे. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा येथील नागेश्वर मंदिरात जंगी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर होते. यावेळी आ. सुभाष साबणे, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जि. प. सदस्या मीनल पाटील खतगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, श्यामसुंदर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like