अशोक चव्हाणांना जे ८ वर्षांत जमले नाही ते मी १ महिन्यात केले ; खासदार चिखलीकर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार चिखलीकर द्वारा म्हटले की कार्यकर्ते मध्ये उत्साह द्विगुणित झाला. भोकर मध्ये चिखलीकर यांच्या खासदार झाल्यानंतर ३ भेटी झाल्या आहेत. ह्या भेटी मध्ये त्यांनी अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्याच बरोबर ऑटो-रिक्षा दुचाकींचा अपघातामध्ये मरण पावलेल्या पोलीस तरुण राजू सूर्यवंशी यांच्या परिवारात तो कर्ता असल्याने त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी खासदार चिखलीकर यांनी भेट दिली. त्या नंतर चिखलीकर यांनी चर्चेत झालेल्या सुधा प्रकल्प (तलाव) पिंपळढव यांचे प्रमाणपत्र कोणी व कसे आणले यासाठी पत्रकार परिषद घेतली

सविस्तर वृत्त असे की, सुधा रेणापुर प्रकल्प व पिंपळगाव तलावाचा पाणी उपलब्धतेच प्रमाणपत्र मिळालेला आहे. पण हे नेमकं कोणत्या खासदारांची कार्यशैली आहे हे जनतेपुढे स्पष्ट झाले नव्हते. अशोक चव्हाण यांनी केलेला नुसता पाठपुरावा कामाचा ठरला नाही. तर प्रताप चिखलीकर यांची मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याशी झालेली भेट महत्वाची ठरली आहे. त्या मुळे ह्या प्रकल्पाची व तळ्यासाठीची पाठपुरावाचे महत्वाची कागदपत्रे सुद्धा चिखलीकर यांच्या कडे आहेत. असे त्यांनी या वेळी सांगितले या श्रेय घेण्यासाठी पेपर मध्ये मोठं मोठ्या जाहिराती देणे व प्रसिद्धी करणे हे त्यांना जमते यांनी तेच केलं. असे ते नाव न घेता अशोक चव्हाण यांच्या वर टीका केली.

मी खासदार झाल्यानंतर त्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी प्रलंबित असलेला सुधा प्रकल्प व पिंपळढव प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांना चिखलीकर यांनी पत्र देऊन केले त्या प्रलंबित प्रश्नाला काढले निकाली. सुधा प्रकल्पाची उंची वाढविणार व पिंपळढव तलावाचे काम लवकरच सुरू होणार अशी माहिती नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांना बोलताना दिली.

अशोक चव्हाण यांचे भोकरकडे आता जास्तच लक्ष झाले आहे. मी जर एकच भेट दिली तर त्या भेटी साठी अशोक चव्हाण भोकर मध्ये संपूर्ण एक महिना स्थाही राहतील अशी देखील मतदार संघातील लोक म्हणत आहेत म्हणून खासदार यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी सांगितले.

भोकर तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्प उंची वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्याच्या जनतेची होती. ती मागणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असून त्या पदावर पूर्ण केली नाही. पण मी हीच मागणी १ महिन्यात पूर्ण केली आहे. त्या मुळे ह्याच श्रेय नेमकं कोण घेणार ह्या पेक्षा जनतेचं काम झालं ते महत्वाचं असेही ह्या मनमोकळे पणाने खासदार चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रेणापूर सुधा प्रकल्प आवश्यक (उंची ) वाढवणे त्या मधूनच भोकर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केली जाते. पिंपळढव तलावाची मागणीसुद्धा जनतेची होती. त्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आवश्यक होते ते प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच हे दोन्ही काम चालू करण्यात येईल असे मत नांदेड लोकसभा मतदार संघातील खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी चिखलीकर यांचे समर्थक दिलीप सोनटक्के, बहुजनांचे नेते नागनाथ घिसेवाड, राजा खंडेराव देशमुख, बहुसंख्ये पत्रकार यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते

दीपिका पादुकोणला ‘या’ खेळाडूवरील बायोपिकमध्ये काम करण्यात ‘रस’

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

वेळेवर औषधे न देणाऱ्या पुरवठादारांवर मेस्मातंर्गत कारवाई करा

चिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा