‘ताकतच पहायची असेल तर…’ राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या नेत्यांनी स्वत:च्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले (mp chtrapati sambhaji raje bhosale) यांना लक्ष्य केलं आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी खा. संभाजीराजे (mp chtrapati sambhaji raje bhosale) यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत एक प्रकारे इशाराच दिला आहे. ताकत पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू असा सूचक इशारा संभाजेराजे भोसले यांनी दिला आहे.

ताकतच पहायची असेल तर…

खासदार संभाजीराजे (mp chtrapati sambhaji raje bhosale)  यांनी ट्विटमध्ये म्हटले,
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे.
आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही,
त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे,
कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,
अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी नारायण राणे यांना सुनावले आहे.

त्वचा, केसांच्या समस्या सोडवेल ‘विलायची’, जाणून घ्या फायदे

काय म्हणाले होते राणे ?

गुरुवारी नारायण राणे यांनी संभजीराजेंवर खोचक टीका केली होती. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यात फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का ? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं ट्विट केलं आहे. परंतु त्यांनी ट्विटमध्ये कोणाचंही नाव घेता इशारा दिला आहे.

भाजप नेत्यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले संभाजीराजे राज्यव्यापी दौरा करत आहेत. परंतु कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत आंदोलन करण्यास त्यांचा विरोध आहे. त्यांनी दोन्ही सरकारवर टीका केली आहे. भाजपचा संभाजीराजेंच्या याच भूमिकेला विरोध आहे. संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कलानं वागत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

READ ALSO THIS :

‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित ? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका (व्हिडीओ)

दुर्देवी ! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीची आत्महत्या