मध्यप्रदेश : MP Crime News | पत्नीचे रिल्स इतर पुरुषांनी लाईक केल्याने पतीचा राग अनावर झाला. दोघांमध्ये झालेल्या वादात पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. सुरेश बैगा असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर राधा कोल असे आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. चौकशीत पत्नीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला. शहडोलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. (Wife Kill Husband)
अधिक माहितीनुसार, सुरेश आणि राधा या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. फेसबुकद्वारे दोघांची मैत्री झाली होती. दि.२१ एप्रिल रोजी दोघांमध्ये रिल्सच्या लाइकवरून वाद झाला. या वादात राधाने गळा दाबून सुरेशचा खून केला. मात्र राधाने पोलिसांना खोटी माहिती दिली. तिने सांगितले की, सुरेश खूप दारू पिऊन आला. तो धड जेवलाही नाही आणि आता तो उठत नाही. शेजाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरेशचा मृत्यू झाल्याचे समजले.
पोलिसांना मृताच्या गळ्यावर नखांचे ओरखडे दिसल्याने खूनाचा संशय बळावला. त्यानंतर सुरेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संशयाच्या आधारे पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला.
राधाने पोलीस चौकशीत सांगितले की , पहिल्या नवऱ्यापासून तिला ५ वर्षांची मुलगी आहे. पहिला पती खूप त्रास देत होता. त्यामुळे ती माहेरी राहायला आली. याच काळात फेसबुकवर तिची ओळख सुरेशशी झाली. तो तिचे रील्स लाइक करत होता. त्यांच्यात आधी मैत्री निर्माण झाली आणि नंतर ते एकमेकांवर प्रेम करु लागले. सुरेशने त्याचे एक लग्न झाल्याचे राधाला सांगितले होते. दोघे आधी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. काही दिवसांनी त्यांनी लग्न केले.
लग्नानंतर सुरेश तिच्यावर सतत संशय घेऊ लागला. तिच्या रील्सवर कोणत्याही पुरुषाने लाईक केलं तर तो राधावर रागवायचा आणि तिला शिवीगाळ करायचा. अनेकदा दारू पिऊन मारहाणही करत होता. दोघांमध्ये झालेल्या वादात त्याने माझ्यासह मुलीवर हात उचलला. त्यानंतर आपण पतीची गळा दाबून हत्या केली.