‘ट्रोल’ झाल्याने ‘या’ खासदारांने केली थेट ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – खासदार अनेक संसदेत सरंक्षण असल्याने तारतम्य सोडून बोलतात. बिहारमधील गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत बोलताना जीडीपीवरुन तारे तोडले होते. त्यामुळे लोकांनी सोशल मिडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले. त्यामुळे संतापलेल्या दुबे यांनी लोकसभेत शुन्य प्रहराच्या वेळी चक्क सोशल मिडियावर अंकुश लावण्याची मागणी केली आहे. संसदीय कार्यवाहीवर कोणत्याही संसद सदस्यांना ट्रोल करण्याचा सोशल मिडियाला हक्क नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

आपल्या कार्यकर्त्यांंकडून पाय धुऊन घेण्याचे समर्थन केल्यावरुन मागील लोकसभेच्या कार्यकाळात निशिकांत दुबे हे चर्चेत आले होते. देशाच्या जीडीपीतील वाढत्या घसरणीबाबत लोकसभेत चर्चा सुरु असताना त्यात भाग घेताना निशिकांत दुबे यांनी जीडीपीला काही अर्थ नाही. जीडीपीची पद्धत १९३४ मध्ये आली. त्याच्या अगोदर जीडीपी नव्हता. फक्त जीडीपीला बायबल, रामायण किंवा महाभारत यांच्याप्रमाणे सत्य मानणे योग्य नाही. यावरुन सोशल मिडियावर त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आले.

त्यानंतर मंगळवारी दुपारी शुन्य प्रहारच्या वेळेत निशिकांत दुबे यांनी आपल्यावर होत असलेल्या टिकेचा विषय उठविला. त्यांनी सांगितले की, संविधानातील अनुच्छेद १०५ आणि १०५ (२)नुसार सदनात होणाऱ्या चर्चेचे वृत्तांकन योग्य प्रकारे व्हावे, जेणे करुन कोणत्याही सदस्याला न घाबरता आपले विचार मांडता आले पाहिजे. अनुच्छेद १०५ अस्तित्वात आला तेव्हा सोशल मिडिया किंवा ब्रेकिंग न्यूज नव्हते.

Visit : Policenama.com