MP Dr. Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हेंनी केला कट्टर विरोधक आढळराव पाटलांना फोन, म्हणाले… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Dr. Amol Kolhe | शिरुर लोकसभा मतदार संघात (Shirur Lok Sabha Constituency) आजी-माजी खासदार व लोकप्रतिनिधींमध्ये नेहमीच राजकीय श्रेयवादावरुन जुगलबंधी सुरु असते. राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalrao Patil) यांच्यातील राजकीय संबंध सर्वांनाच माहित आहेत. नुकताच त्यांचा एक वाद चांगलाच रंगला होता. स्थानिक राजकारणावरुन हे दोन नेते एकमेकांवर टीका करत असतात. मात्र, बैलगाडा शर्यती संदर्भात आम्ही एक आहोत अशा आशयचा संदेत देण्याचा प्रयत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे. त्यांनी स्वत: आढळराव पाटील यांना फोन करून बैलगाडी संदर्भात बैठक घेत असल्याची माहिती दिली. आढळाराव पाटील यांना फोन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

बैलगाडा शर्यत (Bullock cart race) हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड येता कामा नये. सर्वांनाच सोबत घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे. यामध्ये ज्येष्ठ म्हणून आपलेही मार्गदर्शन हवे आहे. पुढची वाटचाल कशी करायची, कसे सामोरे जायचे यामध्ये तुमचेही सहकार्य हवे आहे, अशी भूमिका घेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आज (शनिवार) खासदार अमोल कोल्हे यांनी फोन केला.

https://fb.watch/7nAQ1L6zNb/

अमोल कोल्हे म्हणाले, बैलगाडा शर्यती हा आपल्या दृष्टीने कुठल्याही श्रेयवादाचा विषय नसल्याने आपण पक्षभेद न बाळगता सामूहिक प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सर्वांची एकजूट दिसली पाहिजे.
त्यामुळे सर्वच पक्षातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी,
शेतकरी यांची वज्रमूठ बांधून हा लढा द्यायचा हा मनोदय असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी नव्याने रणनिती आखण्यासाठीच्या आजच्या ओझर येथील बैठकीत सहभागी होण्याची विनंती खासदार कोल्हे यांनी केली.
राजकीय मतभेद बाजूला सारून आवर्जून शिवाजीराव आढळराव पाटील यांना फोन करून आपलंही मार्गदर्शन व्हावं अशी विनंती त्यांनी केली.
परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत आपली वेळ घेऊन आपल्याकडे चर्चेसाठी येतो असेही डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना आवर्जून सांगितले आहे.

Web Title :- MP Dr. Amol Kolhe | Dr. Amol Kolhe calls Former shivsena MP Adhalrao Patil, a staunch opponent, and says … (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police News | चेक पोस्टवर पोलीस कर्मचार्‍याला चिरडून पळाला कार चालक, पाहा धक्कादायक व्हिडीओ

Pune Police | सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

Facebook Friend | लग्नाचा प्रस्ताव फेटाळला तर फेसबुक फ्रेंडने ‘गावभर’ लावली तरूणीची पोस्टर्स, गुन्हा दाखल