MP Dr. Amol Kolhe | ‘मी पुन्हा येईल असं म्हणायची हल्ली भीती वाटते’, अमोल कोल्हेंचा टोला; शिरुरच्या उमेदवारीबाबत म्हणाले… (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) पुढील वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांकडून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. तसेच इच्छूक उमेदवारांबाबत चर्चा सुरु झाली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे कोणत्या जागेवर कोणता उमेदवार निवडणूक लढवणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. याच दरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) आणि विलास लांडे या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी या जागेवर दावा केला आहे. विलास लांडे (Vilas Lande) या मतदारसंघातून इच्छुक असताना अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टोला लगावला आहे.

सोमवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पुण्यातील निसर्ग मंगल कार्य़ालयात येथे झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe), माजी आमदार विलास लांडे, आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवारांनी आज शिरुर मतदार संघातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 2019 मध्ये मी इथली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race), पुणे-नाशिक महामार्गावरची (Pune-Nashik Highway) वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि पुणे-नाशिक रेल्वे (Pune-Nashik Railway) या तीन मुद्यांवर लढवली. बैलगाडा शर्य़त आणि पुणे नाशिक महामार्गावरची कोंडी हे दोन प्रश्न सुटले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प भूसंपादन आणि कॅबिनेटच्या मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. हा आढावा शरद पवारांच्या समोर मांडला.

 

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, जनसंपर्काबाबत काही सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार आगामी काळात काम करणार असून उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्ष घेईल.
शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण.
त्यामुळे इतर कुणीही अकारण चर्चा करू नयेत.
मी कलाक्षेत्रात काम करतो, अनेकांच्या भेटी होतात, त्याचा वेगळा अर्थ काढू नका.
मी पुन्हा येईल म्हणायला आजकाल मला भीती वाटते. तयारी तशीही सुरुच आहे.
माणूस महत्त्वाचा नसून पक्ष महत्त्वाचा आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

 

Web Title :  MP Dr. Amol Kolhe mp amol kolhe im afraid to say again amol kolhe taunt said about shirurs candidature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा