MP Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल, राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Dr Amol Kolhe | कला आणि अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेले आणि विद्यमान खासदारास चितपट करून शिरूर लोकसभा मतदार संघातून (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादीच्या (NCP) तिकीटावर खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांनी काही वेळासाठी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. सध्या ती पोस्ट व्हायरल होत असून राजकीय क्षेत्रात या पोस्टमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

खा. अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांनी केलेल्या पोस्टमध्ये गेल्या काही वर्षात घेतलेल्या निर्णयाचा विचार तसेच फेरविचार करण्याचा मानस देखील बोलून दाखवला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमुळं राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आपल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये खा. अमोल कोल्हे म्हणतात….

 

 

सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!
घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!
त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!!

टीप :- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही

 

Web Title :- MP Dr Amol Kolhe | NCP MP Dr. Amol Kolhe’s Facebook post goes viral, a huge sensation in the political maharashtra politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा