राज्यराणी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी खा. डॉ. भारती पवारांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – राज्यराणी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करून नाशिककरांना न्याय मिळवून द्यावा या अनुषंगाने दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची मुंबई येथील दालनात भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपूर्वी मनमाड- मुंबई राज्यराणी एक्सप्रेस विस्तारित करण्यास खासदार डॉक्टर भारती पवार यांनी तीव्र विरोध देखील केला होता. राज्यराणी नांदेडपर्यंत वाढविण्याऐवजी नांदेड मुंबई नवीन गाडी सुरू करावी. आणि राज्यराणी एक्सप्रेसला पूर्ववत सुरू करून परतीच्या प्रवासात निफाड, लासलगाव हे थांबे द्यावे, जेणेकरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार नाही असे खा. पवार यांनी मित्तल यांना सांगितले. राज्यराणी ही स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची गाडी आहे. घेतलेल्या निर्णयामुळे मनमाड – मुंबई मनमाड – पंचवटी एक्सप्रेसवर गर्दीचा भार वाढेल आणि यापूर्वीदेखील तपोवन एक्सप्रेस ही मनमाड व नाशिकसाठी असलेली गाडी नांदेडपर्यंत वळवली. त्यामुळे राज्यराणी नांदेडपर्यंत वळविण्या ऐवजी नांदेड मुंबई मार्गावर नवीन रेल्वे गाडी सुरू करावी अशी आग्रही मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी मित्तल यांचेकडे केली आहे.

या चर्चेदरम्यान मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी खासदार डॉक्टर भारती पवार यांना आश्वासित केले की, मनमाड व नाशिककरांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची तसेच त्यांच्यासाठी असणारे डबे हे त्यांच्या साठी आरक्षित असतील व वेळेत ही कुठला ही बदल होणार नाही नक्कीच दखल घेणार असल्याचे सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like