खासदार आणि शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि उत्तर पश्मिच लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची नुकतीच कोविड चाचणी करुन घेतली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. उपचारासाठी ते काल लीलावती रुग्णालयात स्वत: दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घेऊन योग्य खबरदारी घ्यावी, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. त्यांचे गोरेगाव पूर्व आरे रोड येथील स्नेहदीप कार्यालय काही दिवस खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. खासदार किर्तीकर लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू व्हावेत, अशी सदिच्छा सेनेचे पदाधिकारी व त्यांच्या चाहत्यांनी सोशलमिडियाद्वारे व्यक्त केली आहे.

गेल्याच आठवड्यात त्यांनी वर्सोवा लोखंडवाला भागातील समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन व स्थानिक सेना पदाधिका-यासह पाहणी दौरा केला होता.कोरोनाकाळात देखील मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून विविध भागांचा दौरा केला होता. खासदार किर्तीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, मी काल माझी कोविडची तपासणी करून घेतली. तो अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने प्रकृती उत्तम असून रुग्णालयात उपचार घेत आहे.