MP Girish Bapat | ‘बिबवेवाडीतील ESIC रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसोबतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे’ – खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Girish Bapat | पुण्यातील (Pune News) बिबवेवाडी येथील केंद्रीय कामगार मंत्रालयाच्यावतीने (Union Ministry of Labor) चालविण्यात येणार्‍या कर्मचारी राज्य विमा रुग्णालयामध्ये (ESIC) 200 बेडस्चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करुन उर्वरित 300 खाटांचे आणि हॉस्पिटलशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याची मागणी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी आज लोकसभेत केली.

 

खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी सांगितले, की ”हे रुग्णालय 16.5 एकर परिसरात आहे.
जिथे 50 खाटांच्या ओपीडी विभागाची सुविधा उपलब्ध होती. या रुग्णालयाच्या विस्ताराची नितांत गरज आहे.
या संदर्भात लोकप्रतिनिधींनी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयाकडे वैद्यकीय महाविद्यालय
आणि 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी आणि उपलब्ध जागेत ओपीडीसह आयपीडी सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.”

 

”ऑक्टोबर 2018 मध्ये येथील 200 खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
उर्वरित 300 खाटांचे आणि हॉस्पिटलशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याची नितांत गरज असल्याचे
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचे व केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
सदर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुण्यासह इतर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

 

Web Title :- MP Girish Bapat | MP Girish Bapat’s demand in Lok Sabha to start medical college along with super specialty hospital at ESIC Hospital in Bibwewadi

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh | ‘महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ पण, सत्ताधाऱ्यांनी त्यांना वसुलीतून मोकळीक दिली तर ना’

 

Pune Crime | महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजरकडून विनयभंग, पुण्यातील विमानतळ परिसरातील घटना

 

Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान