पुण्यात खा. बापट यांचं नाव असलेली भाजपची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर काँग्रेसने (Pune Congress) सुरु केलेल्या विनामूल्य छत्री दुरुस्ती (Free umbrella repair) उपक्रमावरून भाजपने सोशल मिडियावर बरीच टर उडवली गेली होती. 70 वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता काही भाजपची धडगत नाही, अशा या पोस्ट होत्या. पण याच केंद्रात आज शुक्रवारी (दि.18) भाजपची एक छत्री दुरुस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या चेष्टेची, टवाळीची भरपाई केली (mp girish bapat).

पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये हा विमामूल्य छत्री दुरुस्तीचा उपक्रम सुरु केला आहे. आज या केंद्रात एका नागरिकाने चक्क भाजपची पुण्यातील खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे नाव असलेली एक छत्री (Umbrella) आणून दिली. तिची रंगसंगती भाजपाच्या (BJP) झेंड्याप्रमाणे असून त्यावर कमळाचे चिन्ह आहे. नाईक नावाच्या शनिवार पेठेतील एका आजोबांनी ती दुरुस्तीसाठी आणून दिली आहे. छत्री दुरूस्ती करणारे रोहिदास कांबळे म्हणाले की, छत्रीच्या काड्या तुटल्या असून कापड साधे असल्याने विरले आहे. बहुधा ती वाटपातील असावी. मी ती दुरूस्त करून देणार आहे. काँग्रेसचे सोशल मिडिया आघाडीचे चैतन्य पुरंदरे यांनी हा क्षण बरोबर आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे.

हे देखील वाचा

 

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

 

Corona Vaccination | लसीचे दोन डोस घेऊनही माजी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना कोरोनाची बाधा

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’

 

सर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता

 

Serum Institute of India | सीरम पुढील महिन्यापासून मुलांसाठी सुरू करणार कोवोव्हॅक्सची ट्रायल ! सप्टेंबरपर्यंत लाँचिंगची अपेक्षा


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : mp girish bapat name bjps broken umbrella named after pune mp girish bapat start congress umbrella repair activity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update