MP Girish Bapat Passed Away | पुण्याच्या विकासाची दुरदृष्टी असलेला नेता हरपला, पुणे पोरकं झालं..!, बापटांच्या निधनानं अनेकांना अश्रू अनावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार (BJP MP) गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत (MP Girish Bapat Passed Away) मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. ‘किंगमेकर’ म्हणून त्यांची ओळख होती. सर्वपक्षांसोबत गिरीश बापट यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात शोककळा पसरली आहे.

बापट यांचे चांगले काम अनेकांना प्रेरणा देईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोकसंदेशात म्हटले, गिरीश बापटजी यांनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोककल्याणाचे प्रश्न मांडणारे ते जवळचे आमदार होते. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.

श्री. गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. ज्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. विशेषत: पुण्याच्या विकासासाठी. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रति संवेदना… ओम शांती

कधीही भरून न येणारी हानी झाली- अमित शाह (Amit Shah)

पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली. बापटजी शेवटच्या श्वासापर्यंत देश व संघटनेच्या हितासाठी समर्पित राहिले. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण संघटन त्यांच्या कुटुंबासोबत उभ आहे. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो. ॐ शांति

आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.

देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार.2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती

सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा नेता हरपला – शरद पवार

गिरीश बापट यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटले, पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha Constituency) खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे (MP Girish Bapat Passed Away) वृत्त अत्यंत दु:द आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

‘पुणे पोरकं झालं…..!’ – चंद्रकांत पाटील

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, पुणे पोरकं झालं…..! भाजपा ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच आम्हा भाजपाच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. RSS चे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री…अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे, आमचा मार्गदर्शक हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली !!

मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड – सुप्रिया सुळे

माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली, असे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

गिरीशजी कायम स्मरणात राहतील – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ((Nitin Gadkari) म्हणाले, गिरीशजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात,
मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीशजी कायम स्मरणात राहतील.

महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते.
त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.

बापटांचे योगदान कधी विसरु शकत नाही – अंकुश काकडे

महानगरपालिका, विधानसभा, राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेले काम,
पुण्यातील विकासाचे योगदान कधीही विसरु शकत नाही. गिरीश बापट यांच्या निधनानं मोठी पोकळी
निर्माण झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (NCP Spokesperson Ankush Kakade) यांनी म्हटले.

पक्षासाठी मोठे नुकसान – विनोद तावडे

भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawde यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले,
राजकारणात आल्यानंतर त्यांच्यासोबत काम करताना खूप अनुभव आला.
सामान्य माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी अनेकांना दिला.
सगळ्या आमदारांची नियमित बैठक, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची त्यांची सातत्याची भूमिका होती.
ते सर्वपक्षीय मित्र होते. वेगवेगळ्या पक्षांशी वाटाघाटी करुन अनेक निवडणुका लढवल्या.
बापट यांचं जाणं पक्षासाठी मोठे नुकासन आहे. कुठल्याही स्तरातील कार्य़कर्त्यांसोबत व्यक्तीसोबत मैत्री जोडणे
आणि त्यांची चूक सहजपणे जाणवून घ्यायचे ही त्यांची खुबी होती.

विकासाची दृष्टी असलेला नेता हरपला – मोहन जोशी

काँग्रेस नेते मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून आम्ही
गिरीश बापटांसोबत काम करतोय. मंत्री, खासदार असले तरी आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहिले.
विविध पदे भूषवले, पुणे शहराच्या विकासाची दृष्टी असलेला नेता होता.
सातत्याने शहराच्या विकासासाठी काम करत होते. सर्वजनिकदृष्ट्या महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी कसे वागले
पाहिजे याची शिकवण देणारी पोकळी गिरीश बापटांच्या जाण्याने उभी राहिली आहे.

एक सच्चा कार्यकर्ता गमावला – प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar)

गिरीश बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सच्चा कार्यकर्ता गमावला.
शाळेपासून आम्ही एकत्र होतो, अठ्ठावन वर्षांची ही आमची साथ संपली याचे फार दुःख होत आहे.
आमदार, खासदार तसेच महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली.
सातत्याने पुण्याचे सर्व प्रश्न लावून धरले. आणिबाणीच्या लढाईपासून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या
जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे आज असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. मनःपूर्वक श्रद्धांजली..

Web Title :- MP Girish Bapat Passed Away | girish bapat passes away poitical leaders reaction sharad pawar supriya sule vinod tawade nitin gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Pune BJP MP Girish Bapat | आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं, आमचा मार्गदर्शक हरपला – चंद्रकांत पाटील

NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल