MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार (BJP MP) गिरीश बापट यांचे बुधवारी (दि.29) दीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल (MP Girish Bapat Passed Away) पुण्यातील राजकीय, समाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. एक सुसंस्कृत, समंजस नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पुण्यात भाजपचा कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बापट यांच्या बद्दल बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (NCP Spokesperson Ankush Kakade) यांना अश्रू अनावर (Tears) झाल्याचे पाहायला मिळाले.

गिरीश बापट आणि अंकुश काकडे हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यात असलेली मैत्रीची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असायची. ज्यावेळी गिरीश बापट रुग्णालयात उपचार घेत होते, त्यावेळी अंकुश काकडे आवर्जून त्यांना भेटण्यासाठी जात व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. गिरीश बापट यांच्या निधनामुळे (MP Girish Bapat Passed Away) काकडे यांना धक्का बसला आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीशी बोलताना अंकुश काकडे यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

अंकुश काकडे म्हणाले, गिरीश आज आपल्यात नाही हे दु:ख सहन होत नाही. राजकारणाच्या (Politics) पलीकडं जाऊन मैत्री करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात होतो. पण आमच्या मैत्रीत कधीच अंतर पडलं नाही. आठवड्यातून दोनदा त्यांना मी भेटण्यासाठी जात होतो. सोमवारी त्यांना भेटलो. ते आयसीयूमध्ये होते. डायलिसीस करुन आल्यामुळे ते थोडे थकल्यासारखे वाटत होते.

त्यावेळी आमच्यात बोलणं झालं. रात्री साडेनऊपर्यंत आम्ही एकत्र होतो. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची
सभा आम्ही पाहिली. त्यावर त्यांनी काही कमेंटही केल्या. अंकुश, मला आता नकोसं वाटतंय, केव्हा सुटतोय
असं झालंय, असं त्यावेळी ते म्हणत होते. पण इतक्या लवकर तो सोडून जाईल असं वाटलं नाही, असं काकडे म्हणाले.

अंकुश काकडे पुढे म्हणाले, आमच्या मैत्रीचे खूप प्रसंग आहेत. सख्ख्या भावापेक्षा जास्त गिरीशनं माझ्यावर प्रेम केलं.
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) आम्हाला GAS (गिरीश, अंकुश, शांतिलाल)
नावानं ओळखलं जायचं. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असूनही कधी पक्षाशी गद्दारी केली नाही.
मित्र असला तरी राजकीय पक्ष वेगळे असल्यानं मी त्यांना मत देऊ शकलो नव्हतो, असंही त्यांनी सांगितलं.

गिरीश बापट यांना दडपे पोहे खूप आवडायचे. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते.
ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले, अरे मला पोटात काही जात नाही, कशाला आणले,
ते ऐकून मला खूप दु:ख झालं, असं म्हणत अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.

Web Title :-  MP Girish Bapat Passed Away | ncp leader ankush kakade on death of girish bapat death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Pune BJP MP Girish Bapat | आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं, आमचा मार्गदर्शक हरपला – चंद्रकांत पाटील

NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल