MP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले – ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच (Shiv Sena) भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करत भाजपसोबत युती करावी अशी मागणीच पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केली आहे. त्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते. जर युती झाली तर आम्हाला त्याचा आनंद होईल, असे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी म्हटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
खासदार गिरीश बापट MP Girish Bapat) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आमदार सरनाईकांच्या पत्रावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सरनाईक यांना भाजपाकडून त्रास दिला जात नाही. यंत्रणा त्यांच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत.
भाजप कोणालाही त्रास न देणारी गरीब पार्टी आहे. गेल्या 25 वर्षापासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते.
नंतर अनैसर्गिक लोकांमुळे आमची तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते.
आमदार सरनाईक आता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होताना बोलत होते.
त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय शिवसेनेला घ्यायचा असल्याचे बापट यांनी म्हटले आहे.
अजितदादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होत, पण…
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील नवीन कार्यालयाच्या उद्धघाटनप्रसंगी झालेल्या गर्दीबाबत खासदार बापटांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजितदादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होत.
पण कार्यकर्ते ऐकत नाही हे माहिती झालं. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक असल्याचा टोलाही बापट यांनी लगावला आहे.
तसेच पुणे पालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रातला एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नसल्याचे खासदार बापट म्हणाले.
Web Title : MP Girish Bapat | shiv sena bjp alliance can be formed on the issue of hindutva girish bapat statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nana Patole । शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही; दिल्लीच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया