खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते वाघोलीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली ता. हवेली येथील वार्ड सहा मधील वाघोली-आव्हाळवाडी सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यासह विविध विकास कामांचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीष बापट व माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

वाघोलीतील वार्ड ६ मध्ये ग्रामपंचायत निधीतून (८८ लाख ९५ हजार) वाघोली-आव्हाळवाडी (उत्सव सोसायटी मेन गेट आव्हाळवाडी) सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्ता भूमिपूजन, पाचारणे हॉस्पीटल ते रिकामे घर सिमेंट कॉंक्रिट (४९ लाख ७२ हजार) शिवतेज पार्क अंतर्गत सिमेंट कॉंक्रिट रस्ता (२९ लाख २० हजार) भूमिपूजन, जेल सोसायटी अंतर्गत सिमेंट कॉंक्रिटीकरण (१४ लाख २० हजार) तर काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तर काही ठिकाणी भूमिपूजन करण्यात अदि कामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीष बापट व माजी आमदार बाबुराव पाचर्णे, पुणे जिल्हा प्रमुख गणेश भेगडे, माजी नियोजन समिती सदस्य संजय सातव पाटील, पुणे उपजिल्हाप्रमुख गणेश कुटे, पं. स. सदस्य नारायण आव्हाळे, माजी नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, उपसरपंच मालती गोगावले, उपसरपंच,माजी उपसरपंच संदीप सातव, जयश्री काळे, गणेश गोगावले, सुनील काळे सह इतर कार्यकर्ते व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना वाघोलीचा उपसरपंच मालती गोगावले यांनी सांगितले की वार्ड क्रमांक सहा सह वाघोलीचा सर्वागीण विकासावर आमचा भर असेल तर वार्ड क्रमांक सहा हा सदिप सातव आणि जयश्री काळे यांच्या मदतीने रस्ते, गटार, लाईट, कचरा, पाणी, समस्या सोडऊन आदर्श वार्ड निर्माण करणार..