धक्कादायक ! मध्यप्रदेशात एका तरुणासह दोन बहिणींना झाडाला बांधून मारहाण

इंदूर : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाला आणि त्याच्या दोन चुलत बहिणींना झाडाला बांधून जमावाकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मुलींमध्ये एक मुलगी अल्पवयीन आहे. विवाहित महिलेला पळवून नेल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आला आहे. तर त्याला मदत केल्याचा आरोप त्याच्या दोन बहिणींवर करण्यात आला आहे. मारहाणीबरोबरच त्या दोन मुलींचा विनयभंग देखील करण्यात आला.
या तिघांना मारहाण होत असताना बघ्यांच्या गर्दीतून त्यांना वाचविण्यासाठी एकही जण पुढे आला नाही. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मारहाण करणाऱ्यांमध्ये त्या विवाहित महिलेच्या पतीचा देखील समावेश होता.

या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी पाच जणांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. बाकी चार जण फरार असून त्यांचा शोध सुरु असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like