Video : ‘मी मास्क घालत नाही’ म्हणणाऱ्या ‘त्या’ भाजप नेत्याचा U-Turn ! व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मास्क संदर्भात एक विधान केल्यानं नवीन वाद निर्माण झाला. टीका झाल्यानंतर त्यांनी यु टर्न घेत आता आपली चूक स्विकारली आहे.

नरोत्तम मिश्रा यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी मास्क लावलं नव्हतं. पत्रकारांनी जेव्हा त्यांना मास्क न लावल्याबद्दल विचारलं होतं तेव्हा मात्र त्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालत नाही त्यानं काय होतं असं उत्तर दिलं होतं. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला. अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्यांतर आता त्यांनी यु टर्न घेतला आहे.

मास्कवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर नरोत्तम मिश्रा यांनी या विधानावर माफी मागितली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

नरोत्तम मिश्रा म्हणाले, “मी माझी चूक स्विकारली आहे. आता मी मास्कचा वापर करणार आहे. कोरोना संकट काळात लोकांनीही मास्कचा वापर केला पाहिजे. सोशल डिस्टेंसिंगचं पालनंही केलं पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतो.” असंही ते म्हणाले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी अनेक सूचना सांगितल्या जातात. अनेकदा सांगूनही अनेकजण मास्क लावत नाही. यासाठी दंड आकारला जात आहे तरीही काही लोक याला हलक्यात घेताना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like