MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री झालेल्या दोन गटातील वादांमुळे (Chhatrapati Sambhaji Nagar Dispute) शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिराच्या बाहेर जमावाने दगडफेक करत रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ केली. वातावरण तणावपूर्ण असताना खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz jaleel) यांनी जमावातून मार्ग काढत राम मंदिरात (Ram Mandir) प्रवेश केला. तिथे जाऊन मंदिर कर्मचाऱ्यांसोबत बसून व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. जलील (MP Imtiaz jaleel) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
इम्तियाज जलील (MP Imtiaz jaleel) म्हणाले, मी किराडपुऱ्यातील राम मंदिरात उभा आहे. तुम्ही पाहू शकता, इथे काहीही गडबड नाही. बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, मंदिरात मी स्वत: उभा आहे, इथे अनुचित प्रकार घडल्याच्या अफवा पसरवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. मी स्वत: जातीने मंदिराच्या आत उभा आहे. बाहेर काही गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. मात्र मी हात जोडून सर्व लोकांना विनंती करु इच्छितो की कृपा करुन शांतता राखा. राम मंदिरात कुठल्याही प्रकाराची चुकीची गोष्ट घणार नाही. याची काळजी मी स्तव: घेत आहे, असं जलील यांनी म्हटले आहे.
समाजकंटकांनी पोलिसांवरही दगडफेक केली
खासदार इम्तियाज जलील पुढे म्हणाले, शहराची एक परंपरा आहे. शहरात सर्व धर्मीयांचे सण एकत्रित साजरे केले जातात. मात्र, किराडपुरा येथे मध्यरात्री अनुचित प्रकार घडला. परिसरातील जुन्या रामंदिरावरुन काही समाजकंटकांनी वातावरण बिघडणव्याचा प्रयत्न केला. समाजकंटकांनी पोलिसांवरही दगडफेक केली.
नशेखोरांनी दगडफेक केली
दंगेखोरांबाबत माहिती देताना जलील यांनी सांगितले, समाजकंटकामध्ये बहुतांश मुले हे बटन प्लेयर म्हणजेच नशेखोर होते.
या नशेखोरांना आपण कोणावर दगडफेक करतोय? कोणावर हल्ला करतोय? हे देखील समजत नव्हते.
त्यामुळे पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन करुन या मुलांना शोधावे.
जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.
Web Title :- MP Imtiaz jaleel | chhatrapati sambhajinagar kiradpura ruckus mim mp imtiaz jaleel ram mandir temple
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update