MP Imtiaz Jaleel | ‘केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करु नका, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त आदर करतो’ – खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात MIM महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) जाण्यास तयार आहे, असं सांगत खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील राजकीय वातावरणात नवा वाद निर्माण केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एमआयएमसोबत युती (Alliance) होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हे मागे हटण्यास तयार नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MIM चा कट उधळवून लावा. ती भाजपची बी टीम (BJP B Team) आहे असं सांगत युती करण्यास नकार दिला. यानंतर खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी म्हटले की, भाजपला दूर ठेवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही कुणाच्याही बोलण्यावरुन मैत्रीचा हात पुढे करत नाही. या देशाला वाचवण्यासाठी आम्हाला हे करावं लागतंय. शिवसेना (Shivsena) कधीही हिंदुत्व (Hindutva) सोडणार नाही. तुम्ही हिंदुत्वाचा गाजावाजा आणखी किती वेळ करणार ? तुम्ही केवेळ हिंदुंचे नाही तर दलित (Dalit), मुस्लिम (Muslim), शीख (Sikh) सर्वधर्मीयांचे मुख्यमंत्री आहात असे जलील यांनी म्हटले.

आम्ही मिशन घेऊन बाहेर पडलोय
इम्तियाज जलील पुढे म्हणाले, खासदार असून मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही हे कुणी सांगेल का ? हिंदुत्ववादी गाजावाजा किती वेळ करणार ? तुम्हाला राज्याची चिंता नाही का ? तुम्ही सगळ्यांचे मुख्यमंत्री आहात. आम्ही मिशन घेऊन आता बाहेर पडलोय. आम्ही महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत राहणार. भाजप या देशासाठी सर्वात घातक पक्ष आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपा समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करते. एका सिनेमाचं प्रमोशन (Movie Promotion) भाजप करतेय. त्यामुळे आघाडीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लवकरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. भेटून यावर चर्चा करु असंही जलील यांनी सांगितलं.

 

संजय राऊतांना टोला
औरंगजेब (Aurangzeb) हा इतिहास झाला. सगळे मुस्लिम त्यांच्या कबरीकडे जाऊन गुडघे टेकतात असं काही नाही.
असेल तर तुम्ही दाखवा. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेऊन राजकारण करु नका.
तुमच्यापेक्षा जास्त आदर आम्ही करतो, मात्र स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा वापर करत नाही असा टोला इम्तियाज जलील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना लगावला.

 

Web Title :- MP Imtiaz Jaleel | for alliance mim mp imtiaz jaleel will meet cm uddhav thackeray and ncp sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा