खा. इम्तियाज जलील यांच्यामुळे ‘वंचित’ आघाडीत ‘फूट’ !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – एमआयएमने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांच्यामुळे वंचित आघाडीमध्ये फूट पडल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला आहे. तसेच इम्तियाज जलील ओवीसींचे ऐकत नसल्याचा आरोप देखील वंचितकडून करण्यात आला.

इम्तियाज जलील म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाबाबत सन्मान राखला नाही त्यामुळे आम्ही वंचितमधून बाहेर पडलो. वंचितने आरोप केला की जलील यांना वंचित आघाडी नको होती, त्यांच्यामुळे एमआयएम वंचितमध्ये फूट पडली. त्यामुळे एमआयएमची 2 महिन्यापासून सुरु असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरली.

जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने वंचितमधून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्याचे एमआयएमकडून सांगण्यात आले. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममधील वाद अखेर चव्हाट्यावर आला आणि खासदार इम्तियाज जलील यांनी घोषणा केली की, आम्ही वंचित बरोबर जाणार नसून, स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावर वंचित आणि एमआयएम स्वबळावर लढतील.

एमआयएमचे प्रकाश आंबेडकरांकडे विधानसभेला 95 जागा मागितल्या होत्या, परंतू प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला 8 जागांची ऑफर दिली होती.