‘त्या’ नातेवाईक महिलेशी पतीचे अनैतिक संबंध असल्याने पत्नीची आत्महत्या

इंदोर : वृत्तसंस्था – पतीचे नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचे समजल्यानंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मध्यप्रदेशातील इंदोर येथे घडला आहे. पतीचे नातेवाईक महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती काही दिवसांपूर्वीच मृत महिलेला समजली होती. पतीला अनैतिक संबंध ठेवण्यास विरोध केला असता त्याने पत्नीला बेदम मारहाण करून तिला घराबाहेर काढले होते. निशा साहू असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पत्नीने या प्रकरणी पंचायतमध्ये दाद मागितली होती. पंचायतने दोघांना समजावून सांगत हा वाद मिटवला होता. पंचायतने वाद मिटवल्याने निशा पुन्हा पतीच्या घरी नांदण्यास आली होती. मात्र, पतीने नातेवाईक महिलेशी संबंध न तोडल्याने तिने अखेर गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. पोलिसांना निशा साहू हिने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती कन्हैयालाल, सासू पार्वती, दिर मुकेश साहू आणि भावजय हेमलता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना इंदोरच्या लसूडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत निशा आणि कन्हैयालाल यांचे लग्न ९ वर्षापूर्वी झाले होते. लग्नानंतर हुंड्यावरून तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता. माहेराहून पैसे आणले नाहीत म्हणून तिला घरातून बाहेर काढले होते. याच दरम्यान पती कन्हैयालालचे नातेवाईक महिलेसोबत संबंध जुळले होते.

पतीला विरोध केल्यानंतर पतीने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे निराश झालेल्या निशाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी