छत पर सोया था बहनोई मैं…, ‘या’ महिला मंत्र्यानं आयटम साँगवर केला ‘भन्नाट’ डान्स ! (व्हिडीओ)

भोपाळ : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. याची खासियत अशी की, हा व्हिडीओ एका महिला मंत्र्याचा आहे. मुझको राणा जी माफ करना या गाण्यावर ही महिला मंत्री थिरकताना दिसत. विशेष म्हणजे एका महिला मंत्र्यानं अशा आयटम साँगवर डान्स करण्यानं त्यांच्यावर विरोधकांची टीकाही सुरू आहे.

व्हायरल व्हिडीओत डान्स करणाऱ्या महिला मंत्र्याचं नाव आहे इमरती देवी. त्या मध्य प्रदेशच्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. इमरती देवी मुझको राणा जी माफ करना या गाण्यावर स्टेप्स करताना दिसत आहेत. साडी नेसलेल्या या महिला मंत्री आयटम साँगवर थिरकत आहेत. दरम्यान इमरती देवींच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परंतु मध्य प्रदेश काँग्रेसनं मात्र त्यांची पाठराखण केली आहे. इमरती देवी यांनी नृत्य करणं चुकीचं आहे का ? असा सवाल काँग्रेसनं केला आहे.

इमरती देवींचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा डबरा मतदारसंघातील आहे. इमरती देवी या नेहमीच चर्चेत असतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्या चर्चेत होत्या. इमरती देवी मंत्री झाल्यानंतर शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. डॉक्टरांची बदली केली तर खर्च जास्त होतो असे म्हणत डॉक्टरांचे निलंबन केले पाहिजे असे त्यांनी म्हटले होते. त्यांचा हा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.

Loading...
You might also like