नारायण राणे यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार 

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांच्यावर मागील काही वर्षात चांगल्याच राजकीय संघर्षला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यांना भाजपने राज्यात मंत्रिपद मागून दिले नाही परंतु त्यांची राजकीय आब राखण्यासाठी त्यांना मात्र राज्यसभेची उमेदवारी दिली.  ती मात्र भाजपच्या एबी फॉर्म वरच. आता राजकीय परिस्थिती बघता आपण राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकले गेल्याचे राणेंच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी आता येत्या लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार हे मात्र निश्चित केले नसले तरी आचारसंहिता घोषित होताच आपण या संदर्भात पत्रकार परिषद घेऊ असे नारायण राणे यांच्या कडून सांगण्यात आले आहे. कणकवलीच्या लाइफ टाइम हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते.

पाच राज्या प्रमाणेच लोकसभेचे निकाल हि धक्का दायक लागणार आहेत. तसेच अदयाप तरी आपला पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष राहील असे नारायण राणे म्हणाले आहेत. तर भाजप नेते  प्रमोद जठार यांच्या वर हि नारायण राणे यांनी टीका केली आहे. प्रमोद जठार आता कुठे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना अद्याप राजकारण कळत नाही तसेच माझी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कसलीही बैठक झाली नाही असे नारायण राणे म्हणाले आहेत.

या जिल्ह्याचा पालकमंत्री कर्तव्य शून्य असून त्यांनी कसली हि कामे केलेली नाहीत. पालकमंत्र्यांना जिल्ह्यात निधी कसा खर्च करायचा याचे हि अद्याप ज्ञान नाही. म्हणून ते नाना पाटेकरांनी म्हणतात आमचा जिल्हा दत्तक घ्या. यांच्या मनात आले तर उद्या हे राज्य हि विकायला काढतील अशी टीका  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक केसरकर यांच्यावर नारायण राणे यांनी केलीय आहे.

जिल्ह्यात विकास कामाचे मागासले पण आणि जिल्ह्यात विकास कामात होणारा भ्रष्टाचार या सर्व बाबींना जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार आहेत असे नारायण राणे म्हणाले आहेत. तर आपण लोकसभेला उमेदवारी करणार का या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. त्याच प्रमाणे विधानसभेला आपण उमेदवारी करणार का याही प्रश्नाचे उत्तर नारायण राणे यांनी दिले नाही. नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रणनीतीचा सावध पवित्रा घेतला असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.