भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंनी केलं मोठं विधान, म्हणाले…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – नारायण राणे यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेची भाजपशी असलेली युती आणि सेनेचा राणेंच्या भाजप प्रवेशाला असलेला विरोध यामुळे नारायण राणेंना स्वतःचा पक्ष काढावा लागला. भाजपने राणेंच्या प्रवेशाबाबत भाष्य केलेले नसल्यामुळे आता नारायण राणेंनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे.

नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे या वेळी
सेना भाजप युती होणार की नाही याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. माझं भाजप वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, मला भाजप नेते पक्षात प्रवेश देणार आहेत. येत्या आठ दिवसात माझा भाजपमध्ये प्रवेश होईल.

यावेळी नितेश राणेंनी केलेले नाणार बाबतच्या वक्तव्याने सर्वच कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. नाणार रिफायनरीबाबत आजही आपण जनतेच्या सोबत असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता म्हणूनच आम्हीही विरोधात होतो. पण आता लोकांचं म्हणणं काही वेगळं असेल तर लोकांशी चर्चा करूनच आपण तशी पावलं टाकू असा वक्तव्य नितेश राणेंनी करताच आधी नाणार बाबत आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे अचानक मवाळ कसे झाले असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

मात्र राणेंच्या प्रवेशावर शिवसेना देखील राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना प्रवेश देण्याबाबत विचार करत होती, मात्र सेनेने या गोष्टीचे खंडन केल्यानंतर नारायण राणे यांना पुन्हा भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत.

Visit – policenama.com