खा. नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त दिलं ‘हे’ अनोखे गिफ्ट

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ४९वा वाढदिवस आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस अनेक वर्षांपासून साजरा करत नाहीत. पण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नेतेमंडळींनी वर्षावर त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी छोट्या-मोठ्या भेटवस्तूही त्यांना दिले आहे. मात्र खासदार नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनोखे गिफ्ट दिले आहे.

नवनीत राणा यांनी आपले पती रवि राणा यांच्यासोबत वर्षावर उपस्थिती लावत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आणि प्रत्यक्षात आपल्या खासदराकीचा आलेला पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केला आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी दान केलेला पगार हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्वीटरवर कुटुंबाचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि त्यांची कन्या दिवीजाही दिसत आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाचा दिवस वर्षावर वृक्षारोपन करत सुरु केला. देवेंद्र फडणवीस हे अनेक वर्षांपासून आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या वाढदिवसाचा गाजावाजा करू नये. त्यामुळे अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच माजी दिवंगत वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ ओळख राहीली आहे.

आरोग्यविषयक वृत्त