…अन् खासदार नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर !

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्थळाची अवस्था दयनिय झाली आहेc यांनी अमरावती चिखलदरा येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची माहिती घेऊन पाहणी केली. यावेळी चिखलदरा पर्यटनस्थळाचे भयाण वास्तव समोर आले. या ठिकाणी अवैध स्टोन क्रशन आणि मुरुम उत्खनन सुरु असल्याचे राणा यांच्या निदर्शनास आले.

विशेष म्हणजे अवैध स्टोन क्रशर चिखलदरा येथील नगराध्यक्ष विजया सोमवंशी यांचे पती, माजी नगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक राजेंद्र सोमवंशी याचे आहे. याच ठिकाणी अवैध उत्खनन करण्यात आले. मात्र, महसूल, वनविभाग, सिडको आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण डोळेझाक केली आहे.

खडीकरण आणि डांबरीकरण यांच्यामध्ये तफावत असल्याने खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत, सिडकोच्या पैशांचा दुरुपयोग होत असून चिखलदरा येथील विकास आराखडा हा पर्यटकांच्या सोयीचा आराखडा असावा अशी सूचना राणा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ चिखलदरा इथं प्रवेशासाठी एक विशेष रस्ता बनवण्यात येत आहे. दहा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे मात्र, हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.

चिखलदरा हे टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट तसंच पर्यटन स्थळ आहे. मात्र, असे असताना देखील या ठिकाणी स्टोन क्रशर व रस्त्यांच्या कामासाठी अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन सुरु आहे. काँग्रेस नगराध्यक्ष विजया सोमवंशी यांच्या पतीचे हे स्टोन क्रशन असून या स्टोन क्रशरला कुठल्याही परवानगी नाही. याबाबत सिडकोचे अभियंता जामकर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र अखेर मान्य केले की हे स्टोन क्रशरला कोणतीही परवानगी नाही.

You might also like