MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केली संजय राऊत, यशोमती ठाकूरांना हात जोडून विनंती; म्हणाल्या…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – MP Navneet Rana | त्रिपुरातील हिंसाचाराचे (Violence in Tripura) पडसाद महाराष्ट्रात पसरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती (Amravati) शहरात मुस्लीम संघटनांनी मोर्चा काढला होता. यावेळी दुकाने बंद करण्यावरून दगडफेक करण्यात आली होती. आज (शनिवारी) बंद घोषित केल्यानंतरही वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आहे. यामुळे वातावरण तंग झालंय. या पार्श्वभुमीवर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा (MP Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

खा. नवनीत राणा (MP Navneet Rana) म्हणाल्या, शुक्रवारी निघालेला मोर्चा आता वेगळ्याच दिशेने चालले आहे. या घटनेच्या सर्वांनी आपापल्या पद्धतीने निषेध केला आहे. सकाळपासून सुरू असलेले आंदोलन चिघळलेले आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने निषेध करावा. सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा आणि अमरावतीला शांत ठेवा. तसेच आतातरी राजकारण सोडा, असं म्हणत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना इशारा दिला आहे.

 

पुढे त्या म्हणाल्या की, राजकमल चौकात पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवल्यानंतर जमाव मिळेल त्या वाटेने पळत गेला. पोलिसांनी अमरावतीत तगडा पोलिस बंदोबस्त लावल्याने तणावपूर्ण शांतता आहे. असे असले तरी सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा आणि शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवा. तसेच, शिवसेनेचे संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही राजकारण सोडले पाहिजे. ही आपली अमरावती आहे. अमरावतीला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अशी विनंती नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केले आहे.

 

दरम्यान, कालपासून अमरावतीमध्ये जे वातावरण निर्माण झाले आहे,
त्याचा निषेध आम्ही आपापल्या पद्धतीने केले आहे.
शनिवारी सकाळपासून सुरू असलेले वातावरण वेगळ्याच दिशेने चालले आहे.
कोणताही पक्ष असो किंवा संघटना असो सर्वांना हात जोडून विनंती करते की शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवा.
असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- MP Navneet Rana | amravati closed mp navneet rana minister yashomati thakur and shivsena mp sanjay raut amravati district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा