ताज्या बातम्यामुंबईराजकीय

MP Navneet Rana and MLA Ravi Rana | राणा दाम्पत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ, कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजद्रोहाच्या (Sedition) आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. राणा दाम्पत्याला (Rana Couple) न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज (सोमवार) पाच वाजताची वेळ देण्यात आली होती. परंतु पाच वाजेपर्यंत निकाल लिहून पूर्ण झाला नाही. त्यामुळे खा. नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांच्या जामीन अर्जावरील (Bail Application) सुनावणी (Hearing) लांबणीवर पडली आहे. दरम्यान उद्या ईद (Eid) सणाची सुट्टी असल्याने निकाल बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावला जाणार आहे.

 

न्यायालयाकडे आज दुपारी अजून एक महत्त्वाची केस आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावर विचार करणं कोर्टाला गरजेचं वाटलं. बुधवारी याप्रकरणावर कोणताही युक्तीवाद (Argumentation) केला जाणार नसून, थेट निकाल सुनावला जाणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत (Public Prosecutor Pradeep Gharat) यांनी दिली.

प्रक्षोक्षक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी मागील आठवडाभरापासून खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) अटकेत आहेत. त्यांच्या जामिनाबाबत सत्र न्यायालय (Sessions Court) सोमवारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु न्यायाधीश राहुल रोकडे (Judge Rahul Rokade) यांनी यावर अद्याप कोणताही निकाल दिलेला नाही.

 

शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांकडून राणा दाम्पत्याचा जामीन अर्जाला विरोध करण्यात आला.
यावेळी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, देशात सद्य:स्थितीत हिंदुत्व (Hindutva) हे मुख्य सूत्र बनले आहे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यासाठी या सूत्राचा राजकीय हितासाठी वापर केला जात आहे.
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली होती.
परंतु त्यांनी जामिनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

 

Web Title :-  hearing on bail application of mp navneet rana and mla ravi rana

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button