MP Navneet Rana | ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो’, भर सभेत नवनीत राणांचा हल्लाबोल

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आज सामूहिक हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण केले. यानंतर बोलताना नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो, अशी घणाघाती टीका नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केली.

 

नवनीत राणा (MP Navneet Rana) पुढे म्हणाल्या, उद्धव ठाकरे आपले घर सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारांवर तुमचे 40 आमदार निवडून आले, ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) जिवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले, ती विचारधारा तुम्ही सांभाळू शकला नाहीत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला, त्याने माझी विचारधारा ‘मातोश्री’त ठेवली नाही, असे टीकास्त्र नवनीत राणांनी सोडले आहे.

 

यावेळी तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा स्टेजवरच भाऊक झाल्या. नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते. लॉकअपमध्ये एका महिलेवर कसे अत्याचार केले? आई, तुला जेलमध्ये का टाकले? असं माझ्या लहान मुलाने विचारले असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. भावनिक होत त्यांनी तुरुंगातील अनुभव शेअर केला.

राणा म्हणाल्या, लॉकअप काय असते याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. लॉकपमध्ये रात्री बारा वाजल्यापासून कोर्टात नेण्यापर्यंत मी अशीच उभी होते. मला काहीच सुविधा दिली नाही. बसायला खुर्चीही नव्हती. मला रात्रभर होणाऱ्या वेदना पाहून तिकडचे पोलिसही व्यतित झाले. ही जागा तुमची नाही अस ते म्हणाले. तुम्ही लढून बाहेर पडाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारा तास जेलमध्ये उभीच होते. हात मागे ठेऊन मी विचार करत होते. मी आयुष्यात कुठली चूक केली त्यामुळे असं सरकार राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

 

कोर्टात गेले तेव्हा आमच्या वकिलांनी कलमे पाहून तुमचा जामीन होईल असं सांगितलं. परंतु पोलीस स्टेशन डायरी पाहिली तेव्हा देशद्रोहाचा (Treason) खटला दाखल केलाय असं म्हटलं. तेव्हा आम्हाला जेलमध्ये काही दिवस रहावे लागेल. जामीन मिळणार नाही असं वकिलांनी सांगितले. तेव्हा मी मानसिकरित्या खचले. रामाच्या नावाने 14 वर्ष रवी राणा (MLA Ravi Rana) आणि मला जेलमध्ये ठेवले अते तरी काय वाटले नसते. मात्र देशद्रोहाखाली जेलमध्ये टाकले याचे दु:ख सहन होत नव्हते, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

Advt.

जेलमध्ये पाणी मागितले तेव्हा सीसीटीव्ही आहे पाणी देऊ शकत नाही असं सांगण्यात आलं.
माझ्यासमोर जेलमध्ये इतर महिला होत्या त्यांना पाणी मिळत होते. राज्य सरकार (State Government)
आमच्यावर डोळे लावून बसलेत त्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही, असे पोलिसांचे शब्द होते.
एक महिना जेलमध्ये राहावे असा कट रचण्यात आला होता, असंही राणा यांनी सांगितलं.

 

 

 

Web Title :  MP Navneet Rana | how was the night in the lockup navneet rana
broke down in tears on stage target uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा