MP Navneet Rana – MLA Ravi Rana | राणा दाम्पत्यानं केली न्यायालयास विनंती, म्हणाले – ‘आम्हाला घरचं जेवण द्या, खाण्याची आबळ होतेय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Navneet Rana – MLA Ravi Rana | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना (MP Navneet Rana – MLA Ravi Rana) मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Tackeray) घरासमोर जात हनुमान चालिसाबाबत (Hanuman Chalisa) आव्हान देणं चांगलंच महाग पडलं आहे. राणा दाम्पत्यावर (Navneet Rana & Ravi Rana) राजद्रोहाचे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणा दाम्पत्य (Rana Couple) तुरूंगात असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच राणा दाम्पत्याने जेवणाबाबत एक कोर्टात (Mumbai Court) अर्ज केल्याची माहिती मिळत आहे.

 

कारागृहामध्ये घरचं जेवण मिळावं यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अर्ज केला आहे. शुक्रवारी सुनावणी होणार असून या सुनावणीआधी त्यांनी घरच्या जेवणासाठीचा अर्ज केला आहे. शनिवारी असलेल्या सुनावणीमध्ये वकील प्रदीप घरत राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

 

आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही,
अशी गंभीर तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
मात्र त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)
यांचा राणांचा तुरूंगातील चहा पितानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

 

दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
आता उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- mp navneet rana and mla ravi rana application to court about home meal in jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Manisha Kayande on Raj Thackeray | ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…’; मनीषा कायंदेंची राज ठाकरेंवर टीका!

 

Maharashtra Cabinet Decisions | पुण्यातील येरवडा येथे नवीन ITI सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी

 

INS Vikrant Fund Case | आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

 

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | ‘ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से’ ! अमृता फडणवीसांनी नाव न घेता साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा