MP Navneet Rana | खा. नवनीत राणांची बोचरी टीका, म्हणाल्या – ‘उध्दव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Navneet Rana | खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी शनिवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर सकाळपासूनच शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी राणा यांच्या खार (Khar, Mumbai) इमारतीसमोर राडा घातला. शिवसैनिकांनी (Shivsena) राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. आता राणा दाम्पत्य देखील आक्रमक झाल्याचे दिसते. राणा दाम्पत्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

”उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री,” असल्याचे वक्तव्य खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केले आहे. या विधानामुळे आता पुन्हा शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, ”मागील 2 वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत. पण काल ते मातोश्री परिसरात शिवसैनिकांना भेटले. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठकही झाली. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री हे सध्या फक्त कोणाला आत टाकायचे, कोणावर कोणती केस करायची, हेच काम करत आहेत. कालपासून आमच्या इमारतीच्या परिसरात असलेल्या बॅरिकेटसला कोणीही टचही केले नव्हते. मग आज शिवसैनिक बॅरिकेटस तोडून आत कसे काय शिरले ?” असं त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ”असं असताना तरीही आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम आहोत.
आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही पूर्वजांच्या जिवावर जगत असाल. पण आम्ही इथपर्यंत स्वत:च्या ताकदीवर आलो आहोत.
मी आता घराबाहेरही पडणार आहे. मातोश्रीवर जाईन.
यानंतर कायदा – सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी ही सरकारची असेल,” असं त्या म्हणाल्या.

 

Web Title :- MP Navneet Rana | MP navneet rana slams cm uddhav thackeray after shivsena workers break barricade and enter his house residence at khar mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा