MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केलेल्या आरोपांची ‘पोलखोल’; Mumbai CP संजय पांडेंनी केला ‘तो’ व्हिडीओ Tweet

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Navneet Rana | चिथावणीखोर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण होईल, असं कृत्य केल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याला अटक (Arrest) करण्यात आली. यावेळी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) मागासवर्गीय असल्याने पाणी न दिल्याचा व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. मात्र आता मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याचा पोलिस ठाण्यातला व्हिडिओ ट्विट करत पोलखोल केली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी ‘हनुमान चालिसा पठण’ (Hanuman Chalisa Pathan) करण्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर कोठडीत मागासवर्गीय असल्याने पाणाी न दिल्याचा आरोप नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. त्याचबरोबर अपमानास्पद वागणूक, छळ झाल्याचा देखील आरोप राणा यांनी केला होता. या आरोपावर आता मुंबई पोलिसांनीच राणा दाम्पत्यांची पोलखोल केलीय.

 

 

राणा दाम्पत्याचे आरोप फेटाळत मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य चहापाण करताना दिसत आहे. राणा दाम्पत्य बसलेल्या टेबलावर बिस्लेरी बॉटल आणि चहा दिसत आहे.
याबाबत ट्विट करत संजय पाडे यांच्याकडून नवनीत राणा यांचे आरोप फेटाळून लावण्यात आले आहे.

 

Web Title :- MP Navneet Rana | mumbai police commissioner tweet a video of navneet rana drinking tea in police station