खासदार नवनीत राणांची मेळघाटातील पेरणी वादात ?

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा या आता एका वादात सापडण्याची शक्यता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर खासदार नवनीत राणा यांनी पेरणी केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी वनविभागाने धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

सोमवारी खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी सेमाडोह येथील सन्नू रामलाल चव्हाण यांच्या जमिनीवर पेरणी केली. त्यावेळी त्या स्वत: अन्य शेतमजुरांसह जमिनीत बियाणे टाकत असल्याचे फोटो ही काढण्यात आले. हे फोटो सर्वत्र व्हायरलही झाले आहेत. मात्र व्याघ्र प्रकल्पामुळे या जमिनीवर पेरणी करण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे हे वनजमिनीवरील अतिक्रमण असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे.

सेमाडोह वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक १७६ मध्ये ही शेती करण्यात आली आहे. उपविभागीय समितीकडे यासंदर्भातील वनहक्क दावा प्रलंबित आहे का, असल्यास किती क्षेत्र सदर दाव्यावर नमूद आहे, संबंधिताने दाव्याची मागणी केव्हापासून केली आहे, याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. सिवाबला एस. यांनी मागवली आहे. त्यात स्वयंसेवी संस्थांनी त्यांची भूमिका मांडली आहे. मनाई असताना देखील पेरणी करण्याचा हा प्रकार वनहक्क कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या आक्षेपामुळेच नवनीत राणा यांनी सन्नू रामलाल चव्हाण यांच्या शेतात केलेली पेरणी वादात सापडली आहे. मेळघाटातील अनेक आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित आहेत. तेथील काही ठिकाणी अतिक्रमणे केली जात आहेत. त्यामुळे वनहक्क कायद्यानुसार जर दावा सिद्ध झाला, तर संबंधित आदिवासीला शेतजमिनीचा पट्टा मिळतो. पण, दावा फेटाळला गेल्यास त्याला जमिनीवरील हक्क सोडावा लागणार आहे.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

You might also like