खासदार नवनीत राणा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन, अमरावती, दि. 6 ऑगस्ट : कोरोनाचे संसर्ग आणखी वाढत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहाजण कोरोनाग्रस्त झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही देखील आज कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे.

नवनीत राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा पती आणि इतर अशा दहा जणांना करोना विषाणूची लागण झालीय. आई-वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने रवि राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेलेत. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू आहेत. कोरोना सदृश्य लक्षणे आढळत असल्याने नवनीत यांनी कोरोना विषाणूची चाचणी केली असता त्या पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनाही आता रुग्णालयात दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे आई-वडिलांसोबत नागपुरात आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे आज त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. राणा यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आणि क्वॉरंटाइन होण्याचे आवाहन केले आहे.

रवी राणा यांच्या घराचा परिसर सॅनिटाइज केला आहे. कोरोना संकट काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौरे केले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनीत राणाही होत्या. रवी राणा यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला?, हे समजलेले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like