MP Navneet Rana | नवनीत राणांवर कारवाई का नाही? तुम्ही मॅनेज झाले का? शिवडी कोर्टाने पोलिसांना झापलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी (Bogus Caste Verification Certificate) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने (Shivdi Magistrate Court) नाराजी व्यक्त केली आहे. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्याच्या (Mulund Police Station) सहायक पोलीस निरीक्षकांनी (API) वेळ मागितला. यावर नाराजी व्यक्त करत शिवडी कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाच्या आदेशांचं पालन होताना इथे दिसत नाही, असे म्हणत कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? पोलीस मॅनेज झाले का? असे प्रश्न विचारून न्यायाधीशांनी पोलिसांना झापले. आता पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे.

 

तक्रारदार जयंत वंजारी (Jayant Vanjari) यांनी कोर्टात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर (Non-Bailable Warrant) पोलीस कारवाई करत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायाधीशांनी पोलीस मॅनेज झाले का? असा सवाल केला. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्यानं शिवडी कोर्टानं पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहे. मात्र अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आणखी वेळ मागल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

 

काय आहे आरोप?
जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला (School Leaving Certificate) दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे.
राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- MP Navneet Rana | why is there no action against navneet rana are you managed the court slap mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन