MP Navneet Rana । ‘आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम पूर्ण करा’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – देशातील पहिल्या असणाऱ्या चिखलदरा (Chikhaldara) येथील पर्यटन स्थळावर सिंगल केबलवरचा स्कायवॉक प्रकल्प (Skywalk project) निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतु, हे काम रखडलेलं आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी याबाबत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांना एक पत्र लिहीत त्यांच्याकडे या प्रकल्पाच्या कामाबाबत मागणी केली आहे. mp navneet rana wrote letter tourism minister aditya thackeray skywalk work chikhaldara

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

खा. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘आदित्यजी आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये (Mumbai, Thane, Konkan) पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) माननीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. हा स्कायवॉकही (Skywalk project) लवकर पूर्ण होणार असेल आणि विदर्भाच्या पर्यटन व्यवसायास चालना मिळत असेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी (CM Uddhav Thackeray) यांचे जिल्हा अमरावतीमधील अचलपूर हे आजोळ असल्यामुळे या कामात आपण स्वत: लक्ष देऊन या कामाला गती द्यावी तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे या स्कायवॉकला माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यायला देखील आमची हरकत नाही, असं नवनीत राणा यांनी पत्रातून नमूद केलं आहे.

पुढे नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी म्हटलं आहे, ‘स्कायवॉकचे (Skywalk project) काम पूर्वी पोलीस दलाच्या वायरलेस यंत्रणेकडून आक्षेप घेत थांबवलं होतं. कित्येक दिवस ते बंद होतं. मात्र, आता त्या कचाट्यातूनही ते कसेबसे सुटले आहे. वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वन व वन्यजीव मंडळाच्या कचाट्यात हे काम अडकलं आहे. सध्या मुख्यमंत्री यांच्याकडेच वनखाते आहे. म्हणून वडिलांकडे हट्ट धरून आपण हे काम मार्गी लावू शकता, अशी मागणी नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांच्याकडे केलीय.

या दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या, ‘चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा टर्निंग पॉइंट ठरेल अशा या स्कायवॉकचे काम पर्यटन मंत्री म्हणून आपण लवकरात लवकर पूर्ण करुन आदिवासी बहुल मेळघाट, चिखलदऱ्याला न्याय द्याल, तेथील गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगाराची चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा करतो, असं देखील नवनीत राणा (MP Navneet Rana) म्हणाल्या.

Web Title :- mp navneet rana wrote letter tourism minister aditya thackeray skywalk work chikhaldara

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास